Sunday, 26 June 2011

काही पुणेरी टोले...(उद्धटपणा हि म्हणू शकता.)

प्रवासाला निघाला आहात

एखादा मित्र किंवा परिचित - प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेज बघून !!!!)
पुणेकर - नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना! शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

:D:D:D:D:D

सकाळी फिरायला निघाला आहात

एखादा मित्र किंवा परिचित : काय "मोर्निंग वाक्" वाटतं??!!!
पुणेकर : काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलय मैलाचे दगड कुणी पहाटे चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!

:D:D:D:D:D

सिनेमागृहा बाहेर
एखादा मित्र किंवा परिचित : काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
पुणेकर : छे! फावल्या वेळात तिकिटे "ब्लैक" करून अर्थार्जन करावं म्हणतोय! पण! इथेही तुम्ही आमच्या "आधी" हजर!!



:D:D:D:D:D

सकाळी सकाळी जर कोणी घरी आले तर
पाहुणा - पेपर वाचताय वाटतं!
पुणेकर - नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही.

:D:D:D:D:D

पाहुणे - अरे वा! घरीच आहात वाटतं?
पुणेकर - नाही माझ्या पश्चात ही इमारत "राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय.

:D:D:D:D:D

हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात.... आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा इरसाल पुणेरी वेटर तर.....

गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...कसला चांगला लागतोय.

No comments:

Post a Comment