Sunday, 26 June 2011

पुणेरी माणसाचे प्रोफाईल वरील काही अटी....



प्रोफाइल वाचण्या आधी हे नियम वाचा.

**कृपया आपल्या चपला बूट प्रोफाइल मध्ये enter करण्या आगोदर बाहेर काढाव्यात!!!!!!!**

1. ही खासगी जागा आहे. आत पाहण्यासारखे काही नाही.

2. स्क्रॅपबुक वर विनाकारण स्क्रॅप टाकु नयेत. उत्तरे मिळणार नाहीत.

3. स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.

4. स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

5. ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे.

6. या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

7. प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये.

8. फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल.

9. अनोळखी व्यक्तिंनी भेट देऊ नये. अपमान झाल्यास आम्ही जबाबदार नाही.

10. फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही.

11. वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल.

12. काही सुचना असतिल तर क्रुपया आपल्या जवळच ठेवा.

No comments:

Post a Comment